प्रॉडक्ट्स
रिन्यू
क्लेम
सपोर्ट
एजंट बना
Suggested
Health Blog
21 नोव्हेंबर 2021
2860 Viewed
Contents
आता ती वेळ पुन्हा आली आहे! कोणती असा प्रश्न पडला आहे का?? उबदार थंडीत गिफ्ट, आनंद देणारी वेळ. अजूनही विचार करताय?. आणखी एक हिंट देतो. ही घंटा वाजते का?? होय, नक्कीच. आम्ही बोलत आहोत ख्रिसमस संबंधी! या उत्सवाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी चांगले जुने ख्रिसमस ट्री हे सर्वात प्रिय आणि लोकप्रिय प्रतीक आहे. आणि या सुंदर परंपरेचे महत्त्व काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ख्रिसमस ट्री हे शाश्वत जीवनाचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की ख्रिसमस ट्री ठेवण्याची परंपरा पहिल्यांदा जर्मनीमध्ये सुरू झाली, त्यानंतर ते 1830s मध्ये यूकेला आली. हिवाळ्याच्या हंगामात येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर काही झाडांनी आपल्यावरील बर्फ झटकून टाकला व हिरवी झाली, अशी आख्यायिकाही सांगितली जाते. अशा प्रकारे, ख्रिसमस ट्री शाश्वतता आणि अमरत्व दर्शवते.
प्राचीन काळापासून असे मानले जाते की ख्रिसमस ट्री मुळे हिवाळ्याच्या ऋतूतील निर्विकार, निस्तेज आणि उदास हवामानात आनंदीपणा, सकारात्मकता आणि आशावादाची भावना येते. खडतर हवामान असूनही हार न मानण्याची आणि हिरवेगार राहण्याची ख्रिसमस ट्री ची भावना सकारात्मकता दर्शवते. तसेच, या सदाबहार झाडांपासून येणारा गोड सुगंध तुम्हाला दररोजच्या तणावापासून मुक्त करण्यास आणि आराम देण्यास मदत करतो.
सुरुवातीच्या काळात, लोक जिंजरब्रेड आणि सफरचंदाचा वापर करून ख्रिसमस ट्री सजवायचे. पण कालांतराने परंपरा विकसित होत गेल्या आणि आता सजावटीमध्ये इलेक्ट्रिक ख्रिसमस लाईट्स, कँडीज, टिन्सेल, बाऊबल्स, चमकणारे तारे, अनेक रंगीत कागदांचे कट आऊट, गोल्ड फॉईल्स, सिल्व्हर वायर्स, सांताक्लॉज पपेट्स सारख्या लहान बाहुल्या, कृत्रिम स्नोफ्लेक्स आणि ख्रिसमस घंटा वापरतात.
असे म्हटले जाते की सांता क्लॉज मुलांसाठी ख्रिसमस पूर्वसंध्येला भेटवस्तू आणतो आणि ख्रिसमस ट्री खाली गिफ्ट ठेवतो. ही परंपरा अधिक मजेदार बनविण्यासाठी, सांताक्लॉजला चकित करण्यासाठी लोक मोठे झाड आणतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर सजवतात. ख्रिसमस ट्री ही एकत्र येण्याची व गिफ्ट उघडून बघण्याची एक चांगली जागा आहे. सर्व उत्सव तुम्हाला ठराविक मर्यादेपर्यंत प्रोत्साहित करतात, तथापि, तुम्ही एक्स्चेंज करत असलेले गिफ्ट सुखद धक्का व मनोरंजन निर्माण करतात. या उत्सवाच्या हंगामात, तुमच्या प्रियजनांना काहीतरी गिफ्ट द्या जे तुम्हाला आयुष्यभर त्यांच्या आठवणीमध्ये ठेवते.
या ख्रिसमसला, ख्रिसमस ट्री खाली अद्वितीय भावनांचे तुमचे विशेष गिफ्ट ठेवा. या उत्सवाच्या हंगामात तुमच्या प्रियजनांना काहीतरी युनिक गिफ्ट द्या - #GiftABetterEmotion. तुमच्या प्रियजनांबद्दल तुमचे प्रेम आणि काळजी व्यक्त करण्याचा त्यांना सुरक्षिततेची भावना देण्यापेक्षा चांगला मार्ग कोणता असू शकतो?? आमच्या वेबसाईटला भेट द्या - https://apps.bajajallianz.com/gift-an-insurance/index.html आणि तुमच्या प्रियजनांना भेट द्या जनरल इन्श्युरन्स पॉलिसी जी आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या फायनान्सची काळजी घेऊ शकते. सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा, मेरी ख्रिसमस!
What makes our insurance unique
With Motor On-The-Spot, Health Direct Click, etc we provide fast claim process , Our sales toll free number:1800-209-0144