रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
Teach your kids these hygiene tips
सप्टेंबर 14, 2020

तुमच्या मुलांसाठी वैयक्तिक स्वच्छता विकसित करण्यासाठी टिप्स

आरोग्यदायी स्वच्छता दिनचर्या ही तुमच्या मुलांनी आत्मसात करण्याच्या अनेक चांगल्या सवयीपैकी एक आहे. कुणीतरी म्हटलंय लहान मुले ही मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. आपण जसे ठरवू त्याप्रमाणे ते आकार घेत असतात. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातच चांगल्या सवयी शिकविणे हे दीर्घकाळासाठी फायदेशीरच असेल. आता, तुम्ही घरी आहात, तुमच्या मुलांसोबत वेळ घालवत आहात, कारण ठरतयं कोविड विषाणूचा उद्रेक, तुम्ही तुमच्या मुलांना काही वैयक्तिक स्वच्छता टिप्स शिकवू शकता. ही निश्चितपणे काळाची गरज आहे.

तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकता अशा वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी कोणत्या?

 • तुमच्या मुलांना पाणी आणि साबणाने त्यांचे हात धुवायचे शिकवा. जरी मुले खेळण्यासाठी बाहेर पडत नसले तरी ते कोणत्या ना कोणत्या गोष्टींना स्पर्श करत असतात. जेव्हा तुम्ही तुमचे घर स्वच्छ करता तेव्हा तुमच्या टेबल टॉप्स आणि शो-पीस वर मोठ्या प्रमाणात धूळ साचण्याची शक्यता असते. म्हणूनच, तुमच्या मुलांना खाण्यापूर्वी, स्वच्छतागृहातून आल्यानंतर आणि घरातील पाळीव प्राण्यांसोबत (जर असल्यास) खेळल्यानंतर त्यांनी हात व्यवस्थित धुतले असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
 • तुमच्या मुलांना खाण्यापूर्वी भाजीपाला व फळे धुवून घेण्यास सांगा. फळे आणि भाजीपाला यांच्या पृष्ठभागावर सर्वसाधारणपणे सूक्ष्मजीव असतात. तसेच, तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत अनेक हातांचा त्यांना स्पर्श झालेला असतो. त्यामुळे व्यवस्थित पणे धुतल्यानंतरच फळांचे सेवन करायला हवे.
 • खोकताना आणि शिंकताना तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या तोंडाला कव्हर करण्यासाठी टिश्यू किंवा रुमाल सोबत बाळगणे आवश्यक असल्याचे शिकवा.. कोरोनाव्हायरस सारख्या संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. तुम्ही तुमच्या मुलांना मास्क वापरण्याचा आणि वापरण्यासाठी योग्य मार्ग शिकवणे आवश्यक आहे. तुम्ही घरी असताना मास्क घालणे अनिवार्य नसले तरीही, भविष्यात ही चांगली सवय शिकवणे उपयुक्त ठरू शकते.
 • सामाजिक अंतर आणि त्याच्या महत्त्वाबद्दल त्यांना शिक्षित करा. प्रत्येकजण घरामध्ये बंदिस्त असला तरीही जेव्हा गोष्टी पुन्हा पूर्वपदावर येतील तेव्हा सामाजिक अंतर राखणे ही महत्वाची बाब ठरणार आहे.
 • तुमच्या मुलांनी विकसित करावयाच्या इतर काही मूलभूत स्वच्छता दिनचर्या पुढीलप्रमाणे:
  • दिवसातून दोनदा दात घासणे
  • नियमित अंघोळ करणे
  • नियमितपणे केस धुणे
  • दररोज स्वच्छ आणि नेटके कपडे परिधान करणे
  • त्यांची खोली स्वच्छ ठेवणे
  • प्रत्येक वापरानंतर टॉयलेट फ्लश करणे
  • नखे वाढल्यानंतर नियमित कापणे
  • नखे स्वच्छ ठेवणे

तुमच्या मुलांना वैयक्तिक स्वच्छता सवयी कशी शिकवावी?

जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना 'स्वतःला स्वच्छ आणि निरोगी ठेवा' असे सांगत असाल तेव्हा ते कदाचित तुमचे ऐकणार नाहीत.. तुमच्या मुलांना चांगली सवय विकसित करण्यासाठी शिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतः त्या सवयी आत्मसात करणे.. मुले तत्काळ मोठ्या व्यक्तींचे अनुकरण करत असतात.. त्यामुळे, नेहमी बोलण्यापूर्वी कृती महत्वाची हे लक्षात असू द्या.. तुमच्या मुलांना स्वच्छता शिकवण्याचा आणखी एक मनोरंजक मार्ग म्हणजे खेळातून, कोडी सोडवून आणि काही मजेदार विज्ञान प्रयोग करून त्यांना शिकवणे होय.. विविध कार्टून आणि ॲनिमेटेड कार्यक्रम आहेत जे तुम्हाला या स्वच्छता पद्धती शिकवण्यास मदत करू शकतात.. तुम्ही एक मजेदार आणि माहितीपूर्ण कठपुतली बाहुल्यांचा कार्यक्रम आयोजित करू शकता आरोग्यदायी सवयी आणि त्याचे महत्त्व प्रदर्शित करणारा. आम्हाला आशा आहे की या टिप्स तुमच्या मुलांना निरोगी होण्यास मदत करतील. तुम्ही त्यांची फिटनेस सुनिश्चित करत असताना, आम्ही शिफारस करतो की तुम्ही पुरेसे इन्व्हेस्टमेंट करून त्यांची सुरक्षा सुनिश्चित करावी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनची खरेदी करावी. जे आकस्मिक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत सहाय्यक ठरू शकतात.   *प्रमाणित अटी लागू इन्श्युरन्स हा विनंतीचा विषय आहे. लाभ, अपवाद, मर्यादा, अटी व शर्तींविषयी अधिक तपशीलासाठी, कृपया सेल्स पूर्ण करण्यापूर्वी सेल्स ब्रोशर/पॉलिसी मजकूर काळजीपूर्वक वाचा.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत