• search-icon
  • hamburger-icon

हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन लवकर खरेदी करण्याची 5 कारणे

  • Health Blog

  • 21 डिसेंबर 2022

  • 73 Viewed

लवकर स्टार्ट करा! तुमच्या पॉलिसीचे योग्य लाभ मिळविण्यासाठी हा तुमचा हेल्थ इन्श्युरन्स मंत्र असावा. अनेक तरुण, नुकतेच कॉलेज मधून निघालेले आणि नवीन नोकरीमध्ये असलेले, हेल्थ इन्श्युरन्स कव्हरविषयी कमी काळजी करतील. त्यांपैकी बहुतेक जण इन्श्युरन्सकडे वयस्कांसाठी काहीतरी म्हणून दुर्लक्ष करतील. सरतेशेवटी जेव्हा तुम्ही तरुण, तंदरुस्त आणि आयुष्यात सकारात्मक असाल तेव्हा तुम्हाला हेल्थ इन्श्युरन्सची गरज का असेल लोकांना हे समजत नाही की जेव्हा तुमचे वय वाढते, तेव्हा तुम्ही लवकरात लवकर घेतलेल्या हेल्थ इन्श्युरन्सद्वारे ऑफर केले जाणारे फायदे गमावता. या लेखात, आम्ही काही प्रमुख कारणे दर्शवितो हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी लवकर घेण्याविषयी. कारण 1: प्रतीक्षा कालावधी टाळा बहुतांश लोकांना हे समजत नाही की जेव्हा तुम्ही नवीन हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसाठी साईन-अप करता, तेव्हा तेथे एक महत्त्वपूर्ण प्रतीक्षा कालावधी असतो. हे फंडातील इतर सदस्यांना सहभागी झाल्यानंतर लवकरच मोठा क्लेम करण्यापासून आणि नंतर त्यांची सदस्यता रद्द करण्यापासून संरक्षित करते. या हेल्थ इन्श्युरन्स मध्ये प्रतीक्षा कालावधी याचा असा देखील अर्थ आहे की, व्यक्ती जसजशी मोठी होत जाते, आणि कव्हरची आवश्यकता असू शकते, त्याला/तिला प्रतीक्षा कालावधी पूर्ण होण्याची आणि कव्हर सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागू शकते. जर तुम्ही लवकर सुरू केले, तथापि, तुम्हाला खात्री आहे की जेव्हा तुम्हाला खरोखर कव्हरची आवश्यकता असेल तेव्हा तुमचा प्रतीक्षा कालावधी संपलेला असेल. कारण 2: जास्त प्रीमियम टाळा जर तुम्ही लवकरात लवकर पॉलिसी घेतली तर तुम्ही जास्त प्रीमियमवर लक्षणीयरित्या बचत करू शकता. हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे प्रीमियम तुमच्या वयाप्रमाणे वाढतात. त्यामुळे ते लवकर घेऊन, तुम्ही केवळ तुमच्या आरोग्याच्या जोखमींना कव्हर करत नाही तर काही पैशांची देखील बचत करता. तसेच, संचयी बोनस चा दीर्घकाळापर्यंत लाभ मिळतो कारण प्रत्येक क्लेम फ्री वर्षात ते वाढत जातात आणि पॉलिसीला चालना प्रदान करतात. कारण 3: आरोग्य तपासणी टाळा वृद्ध असतांना हेल्थ कव्हर घेणे आणि त्यानंतर जास्त एस.आय सह हेल्थ कव्हर मिळवू इच्छित असल्यास त्यांच्या आरोग्य स्थितीवर आधारित आरोग्य तपासणी/चाचणीची आवश्यकता भासू शकते. तुमचे वय वाढत असताना, रक्तदाब, मधुमेह इ. सारख्या विविध आरोग्य स्थिती निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत, तुम्हाला त्याच कव्हरसाठी जास्त प्रीमियम द्यावा लागेल. जर तुमच्या काही विशिष्ट पूर्व-विद्यमान अटी असतील तर आरोग्य तपासणीनंतर इन्श्युरन्स कंपनी त्यांना कव्हर करण्यास देखील नकार देऊ शकते. तथापि, जर तुम्ही लवकर सुरू केले आणि या स्थिती नंतर विकसित झाल्यास तुम्हाला पॉलिसीमध्ये ऑटोमॅटिकरित्या कव्हर केले जाते. कारण 4: वैद्यकीय खर्चात तीव्र वाढ टाळा वाढते वैद्यकीय खर्च धक्कादायक आहेत आणि जर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये चांगली रुम हवी असेल तर तुम्ही थोडासा खर्च करण्यास तयार असले पाहिजे. मेडिकल इन्श्युरन्स ऑटोमॅटिकरित्या सुनिश्चित करते की तुमचे सर्व जोखीम कव्हर केले जातील आणि तुम्हाला हवे तेव्हा योग्य वैद्यकीय उपचार मिळतील. कारण 5: तुमच्या सेव्हिंग्स वरील ताण टाळा तुम्हाला सुट्टीवर जायचे असेल, आलिशान नवीन कार खरेदी करायची असेल किंवा लवकरात लवकर निवृत्तीसाठी बरेच पैसे वाचवायचे असतील, तुमच्या सेव्हिंग्सचा वापर तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींसाठी करा. हेल्थ इन्श्युरन्स कव्हर हे सुनिश्चित करते की तुम्हाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आल्यास तुमच्या सेव्हिंग्स वर कोणताही ताण पडणार नाही. दुसऱ्या बाजूला, या गोष्टीचा अभाव केवळ तुमची सर्व सेव्हिंग्स संपुष्टात आणणार नाही, तर तुम्हाला कर्जात देखील टाकू शकते.

Go Digital

Download Caringly Yours App!

  • appstore
  • playstore
godigi-bg-img