प्रॉडक्ट्स
रिन्यू
क्लेम
सपोर्ट
एजंट बना
Suggested
Motor Blog
16 मे 2022
189 Viewed
Contents
मुंबई! मनोरंजन विश्वाची व आर्थिक जगताची राजधानी. कधीही न झोपणार हे शहर 'स्वप्नांचे शहर' म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी एक आहे. दररोज अनेक वाहने वर्दळीच्या रस्त्यांवरून धावत असतात. वाहतूक पोलिस सतर्क असतात आणि कोणीही नियम मोडत असल्याचे आढळल्यास त्यासाठी कठोर पावले उचलली जातात. सुदैवाने मुंबईने देखील ई-चलन प्रणालीची अंमलबजावणी केली आहे. याद्वारे स्थानिक वाहतूक पोलिसांना नियम भंग करणार्यांंना ओळखण्यास आणि तसेच ई-चलनच्या स्वरूपात एसएमएसद्वारे दंड जारी करण्यास परवानगी दिली आहे. मुंबईमध्ये वाहनावरील चलन, पेमेंट आणि चलन स्थिती कशी तपासावी याविषयी अधिक जाणून घ्या.
आपण ई-चलन जाणून घेण्यापूर्वी चलन ही संकल्पना सर्वप्रथम जाणून घेऊया. सोप्या शब्दांत सांगायचे तर, चलन हा एक अधिकृत पेपर आहे ज्याद्वारे वाहतूक नियम आणि नियमनांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन मालक/चालकांसाठी जारी केला जातो. म्हणून जेव्हा ट्रॅफिक चलन जारी केले जाते, तेव्हा तुम्हाला मोटर व्हेईकल्स ॲक्ट, 1988 नुसार गुन्हाच्या आधारावर दंड भरणे आवश्यक आहे. वाहतूक पोलिस विभाग वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करत नसलेल्या कोणालाही चलन जारी करू शकतात. नियम हे अंमलबजावणी करण्यासाठी आहे. तुमच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियम बनवले जातात. तसेच, भारतीय रस्त्यांवर वाहन चालवताना इन्श्युरन्स पॉलिसी लागू असल्याची खात्री करा. जर नसल्यास तुमच्यासाठी योग्य निवड ठरु शकेल ऑनलाईन मोटर इन्श्युरन्स. ई-चलनची संकल्पना भारतीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय द्वारे अंमलात आणली गेली. आज आपण अशा काळात जगत आहोत जेव्हा जवळजवळ सर्वकाही इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. वाहन ई-चलनाची संगणकाद्वारे निर्मिती केली जाते आणि वाहतूक पोलिसांद्वारे वापरला जातो. भारतातील वाहतुकीच्या सर्व डिफॉल्टर्सना ई-चलन जारी केले जाते. वाहतूक सेवा सोयीस्कर आणि पारदर्शक बनविण्यासाठी भारत सरकारने ही प्रक्रिया सुरू केली आहे.
नेमके कसे जारी केले जाते याच्या विचारात आहात? चला तर पुढील प्रक्रिया समजावून घेऊया. मुंबई वाहतूक पोलिस तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. ही नजर कॅमेरा आणि स्पीड सेन्सरच्या रूपात स्थापित केली आहे. कॅमेरा वाहतूक पोलिस कंट्रोल रुमला लाईव्ह फीड पाठवतो. वाहतूक कंट्रोल रुम ही अशी जागा आहे. ज्याद्वारे वाहतूक लाईट्स मॅनेज केले जातात आणि डिफॉल्टर्सवर सातत्यपूर्ण लक्ष ठेवले जाते . हे कॅमेरा वाहन रजिस्ट्रेशन नंबर मिळवण्यासही मदत करतात. यातून, मुंबई वाहतूक पोलिस वाहन मालक/चालकाचे सर्व महत्त्वाचे तपशील प्राप्त करते. डिफॉल्टरच्या नावाने ई-चलन तयार केला जातो, जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर पाठवला जातो. जर सर्व गरज असेल तर ते होम ॲड्रेसवर पाठविले जाऊ शकते. डिफॉल्टरला चलन जारी केल्यापासून 60 दिवसांच्या आत पेमेंट करणे आवश्यक आहे. जारी केलेले ई-चलन तपासण्याचा मार्ग म्हणजे नियमित अंतराने महाराष्ट्र वाहतूक पोलिसांची वेबसाईट तपासणे. ई-चलन तपासण्याच्या स्टेप्स खालीलप्रमाणे:
आता तुम्हाला माहित आहे की मुंबईमध्ये वाहनावरील ऑनलाईन चलन कसे तपासावे. चला पुढे जाऊया आणि तसेच पेमेंट प्रक्रिया देखील समजून घेऊया.
ई-चलन ऑनलाईन भरणे ही एक सोपी प्रक्रिया आहे. ई-चलन जारी केल्यानंतर खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करा:
आतापर्यंत तुम्हाला वाहन नंबरद्वारे ई चलन मुंबई ऑनलाईन कसे तपासावे आणि ऑनलाईन पेमेंट करायचे याची माहिती झाली आहे. आता, पेटीएममार्फत ई-चलनचे पेमेंट करण्याकडे तुम्हाला नेत आहे.
पेटीएम मोबाईल ॲपद्वारे मुंबई ई-चलन देय करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे:
खालील तक्त्यात वाहतूक नियमांच्या उल्लंघनानुसार सुधारित दंडात नमूद केला आहे:
Riding/driving without bike/ कार इन्श्युरन्स पॉलिसी | Rs 2000 |
Driving without seatbelt | Rs 1000 |
Riding without helmet both rider and pavilion rider | Rs 1000 |
No driving license | Rs 5000 |
Do not use a phone if control of the vehicle is in your hands | Rs 5000 |
Driving under alcohol influence | Rs 10,000 In case repetition Rs 15,000 |
Overspeeding | LMV Rs 1000 to Rs 2000 HPV/ MPV Rs 2000 to Rs 4000 (Seizure of license) |
Riding/driving with mobile in hand | Rs 5,000 |
Speeding/racing | Rs 5000 Repetitive violation Rs 10,000 |
Honking in a silent zone | Rs 2000 Repetitive violation Rs 4,000 |
Overloading of two-wheeler | Rs 2,000 and license disqualification |
Overloading of four-wheeler | Rs 200 per additional passenger |
Driving without registered documents | Rs 5,000 Repetitive violations: ?10,000 |
Juvenile offenses | Rs 25,000, cancelling registration for a year, will be ineligible for DL till 25 years of juvenile's age |
Driving with no requisite ticket | Rs 500 |
Operation of oversized vehicles | Rs 5,000 to Rs 10,000 |
Riding/driving after being disqualified | Rs 10,000 |
Obstructing while emergency vehicle goes by | Rs 10,000 |
Bribe offering | Double the complete payable penalty of the roadside violation |
Not adhering to the authorities' order | Rs 2,000 |
स्रोत:
जर तुम्ही तुमचे ई-चलन भरले नाही तर काय होते?
जर एखादा अपराधी 60 दिवसांच्या आत ई-चलन भरण्यात अयशस्वी झाला तर ई-चलन पुढे लोक अदालतकडे फॉरवर्ड केले जाते. कोर्ट प्रामुख्याने ई-चलन रक्कम वाढवू शकते किंवा अपराधीला 03 महिन्यांसाठी कारावासात देखील पाठविले जाते. ट्रॅफिक पोलिसांनी खटलापूर्व नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. दंड भरण्यासाठी लोक अदालत समोर अपराधी उपस्थित राहणे आवश्यक आहे. मोटर वाहन मालकांना एक टेक्स्ट मेसेज पाठविला जातो ज्यामध्ये एक लिंक असते. PDF फॉरमॅटमध्ये असलेली सूचना डाउनलोड करण्याची ती लिंक आहे. लोक अदालतमध्ये अनुपस्थित असलेल्या कोणत्याही मोटर वाहन मालकाला न्यायालयाद्वारे कार्यवाहीचा सामना करावा लागेल आणि अखेरीस अधिक दंड भरावे लागतील.
आदर्शपणे, पुढील कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी, ई-चलन जारी केल्यापासून 60 दिवसांच्या आत भरावे.
दंड किंवा कायदेशीर परिणाम टाळण्यासाठी, तुम्ही भारतातील कायदे आणि नियमांचे पालन करत असल्याची खात्री करा. हे नियम रस्त्यावरील सुव्यवस्था आणि सुरक्षितता सुनिश्चित करतात. तुमचे इन्श्युरन्स पेपर्स तपासा. अडचणी टाळण्यासाठी तुम्ही तपासू शकता कार व टू व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी आणि तुम्ही पुरेसे इन्श्युअर्ड आहात हे निश्चित करा. कायद्यांचे पालन करा आणि जबाबदारीने वाहन चालवा! इन्श्युरन्स हा विनंतीचा विषय आहे. लाभ, अपवाद, मर्यादा, अटी व शर्तींबद्दल अधिक तपशिलांसाठी, कृपया खरेदी करण्यापूर्वी सेल्स ब्रोशर/ पॉलिसी मजकूर काळजीपूर्वक वाचा.
3177 Viewed
5 mins read
20 ऑक्टोबर 2024
175 Viewed
5 mins read
16 नोव्हेंबर 2024
49 Viewed
5 mins read
15 डिसेंबर 2025
95 Viewed
5 mins read
07 जानेवारी 2022
What makes our insurance unique
With Motor On-The-Spot, Health Direct Click, etc we provide fast claim process , Our sales toll free number:1800-209-0144