रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
Difference Between Comprehensive and Zero Depreciation Insurance
मार्च 31, 2021

सर्वसमावेशक आणि झिरो डेप्रीसिएशन इन्श्युरन्समधील फरक

कार इन्श्युरन्स हा एक प्रकारचा मोटर इन्श्युरन्स आहे. ज्याद्वारे कार आणि कार मालकाला अपघातामुळे होणारी जोखीम आणि नुकसानीपासून ऑन-रोड प्रोटेक्शन आणि फायनान्शियल कव्हरेज प्रदान केले जाते. एकूण तीन विविध प्रकारचे कार इन्श्युरन्स - सर्वसमावेशक इन्श्युरन्स, थर्ड-पार्टी इन्श्युरन्स आणि 'पे अ‍ॅज यू ड्राईव्ह (जितके चालवाल, तितके पेमेंट कराल) . श्री. चहलने नवीन कार टोयोटा इटियॉस खरेदी केली. कार इन्श्युरन्स अनिवार्य असल्याचे आणि आता कार इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करणे सोपे असल्याचे त्यांना माहीत होते, त्यांना इंटरनेटवर आढळलेल्या अनेक पर्यायांनी भ्रमित केले होते. त्यांनी आपले मित्र श्री. बेदी यांना विचारले. त्यांनी थर्ड-पार्टी इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्याचा सल्ला दिला, जी अनिवार्य आहे आणि झिरो डेप्रीसिएशन कव्हरच्या ॲड-ऑनसह सर्वसमावेशक इन्श्युरन्स घेण्‍यास सांगीतले. श्री. चहल सर्वसमावेशक इन्श्युरन्स वर्सिज झिरो डेप्रीसिएशन वर्सिज थर्ड पार्टी इन्श्युरन्सची तुलना करतात. प्रीमियम हायर साईडवर होता आणि इन्श्युरन्सच्या खर्चावर बचत करण्यासाठी श्री. चहलने केवळ थर्ड पार्टी इन्श्युरन्स खरेदी केला कारण कार अपघातामुळे झालेल्या इजा, अपंगत्व आणि मृत्यूच्या बाबतीत त्याला आर्थिक दायित्वापासून संरक्षित करेल. सहा महिन्यांनंतर, श्री. चहलची कार चोरीला गेली आणि जेव्हा त्यांनी थर्ड-पार्टी इन्श्युरन्स पॉलिसीवर क्लेम केला तेव्हा त्यांनी क्लेम नाकारला. थर्ड-पार्टी इन्श्युरन्स चोरीमुळे झालेले नुकसान कव्हर करत नसल्याने ते नाकारले गेले. जर श्री. चहलने सर्वसमावेशक इन्श्युरन्स खरेदी केला असता तर ते चोरीमुळे झालेले नुकसान कव्हर करू शकले असते. श्री. चहल यांसारखे अनेक लोक अपघाताशिवाय त्यांच्या कारचे इतर कोणतेही नुकसान विचारत नाहीत आणि खर्च वाचवतात, ते केवळ मूलभूत प्लॅन खरेदी करतात. सर्वसमावेशक इन्श्युरन्सचा प्रीमियम थर्ड-पार्टी इन्श्युरन्सपेक्षा जास्त आहे, परंतु लाभ आणि कव्हरेज मोठी रक्कम वाचवेल त्यामुळे ते खर्च-कार्यक्षम आहे. तसेच, झिरो डेप्रिसिएशनचे ॲड-ऑन कव्हरेज तुम्हाला भविष्यात अधिक पैसे वाचवेल. चला तर तुलना करणे कार इन्श्युरन्स या लेखाच्या माध्यमातून समजावून घेऊया व झिरो डेप्रीसिएशन आणि सर्वसमावेशक इन्श्युरन्समध्ये नेमका फरक जाणून घेऊया व त्यानुसार योजनेची आखणी करूया.

सर्वसमावेशक इन्श्युरन्स वि. झिरो डेप्रीसिएशन

सर्वसमावेशक इन्श्युरन्स हा अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ती, तोडफोड, आग इत्यादींमुळे झालेल्या कारच्या नुकसानीसाठी एक व्यापक कार इन्श्युरन्स प्लॅन कव्हरेज आहे. सर्वसमावेशक कार इन्श्युरन्स हा थर्ड पार्टी आणि ओडी (स्वत:चे नुकसान) कव्हरद्वारे प्रदान केलेल्या इन्श्युरन्सचा मिश्रण आहे. अतिरिक्त कव्हरेजसाठी, रोडसाईड असिस्टन्स कव्हर, झिरो डेप्रीसिएशन कव्हर, मेडिकल इन्श्युरन्स, इंजिन प्रोटेक्टर इ. सारख्या ॲड-ऑन पॉलिसीद्वारे सर्वसमावेशक इन्श्युरन्स पॉलिसीचे कव्‍हरेज पुढे वाढविली जाऊ शकते. मोटर इन्श्युरन्समध्ये, डेप्रीसिएशन म्हणजे वाहनाचे नुकसान, तारखेपासून किंवा वाहनाचे वय यांमुळे होणारे वेळेनुसार कमी होणारे मूल्य. काच मटेरीयलशिवाय प्रत्येक कारच्या भागासाठी डेप्रिसिएशनचे मूल्यांकन लागू केले जाते. झिरो डेप्रिसिएशन ही एक कार इन्श्युरन्स पॉलिसी आहे जी कारचे कोलिशनमध्ये नुकसान झाल्यास सर्व रबर, फायबर आणि धातूच्या भागांसाठी पॉलिसीधारकाला 100% संपूर्ण कव्हरेज प्रदान करते. बॅटरी आणि टायर वगळता कोणत्याही कारच्या भागांच्या कव्हरेजमधून कोणतेही डेप्रीसिएशन केले जाणार नाही. या प्लॅनमध्ये कोणतेही यांत्रिक नुकसान, तेल बदल कव्हर केलेले नाही. तसेच, पॉलिसीधारक एका वर्षात करू शकत असलेल्‍या क्‍लेम्सची संख्या मर्यादित करते.

झिरो डेप्रीसिएशन आणि सर्वसमावेशक इन्श्युरन्स दरम्यान काय फरक आहे?

 
फरक केवळ सर्वसमावेशक इन्श्युरन्स सर्वसमावेशक इन्श्युरन्स + झिरो डेप्रीसिएशन कव्हर
प्रीमियम कमी रक्कम थोडी जास्त रक्कम
क्लेम सेटलमेंटची रक्कम सर्व कार बॉडी पार्ट्ससाठी डेप्रीसिएशन अंदाजित असल्याने सेटलमेंटची रक्कम कमी असते. घसारा अंदाजित नसल्याने सेटलमेंटची रक्कम जास्त असेल.
कार पार्ट्सची दुरुस्ती 50% सर्व दुरुस्ती भागांवर डेप्रीसिएशन विचारात घेतला जाईल. झिरो डेप्रीसिएशन ॲड-ऑन्स सर्व दुरुस्ती खर्च कव्हर करेल.
कारचे वय कारचे वय जसजसे वाढत जाईल तसतसे कारचे डेप्रीसिएशन वाढेल. झिरो डेप्रीसिएशन कव्हर ॲड-ऑनसह, डेप्रीसिएशन शून्य मानले जाईल.

बजाज आलियान्झ कार इन्श्युरन्समध्ये 4000+ नेटवर्क गॅरेज आहे आणि मालक/ड्रायव्हरला रू. 15 लाखांपर्यंत वैयक्तिक अपघात कव्हर देऊ करते. तसेच मागील पॉलिसीमधून कोणताही नो-क्लेम बोनस असल्यास 50% पर्यंत ट्रान्सफर देऊ करत आहे.

एफएक्यू

1 सर्वोत्तम कोणता, झिरो डेप्रीसिएशन की सर्वसमावेशक इन्श्युरन्स?

झिरो डेप्रीसिएशन हे अतिरिक्त कव्हरेज आहे जे सर्वसमावेशक इन्श्युरन्ससह खरेदी केले जाऊ शकते. जर आपण दीर्घकाळ कार ठेवण्याचा विचार करीत असाल तर आपल्या कारचे मूल्य आपण खरेदी केलेल्या दिवशीच जवळपास झिरो डेप्रीसिएशन अ‍ॅड-ऑन सह सर्वसमावेशक इन्श्युरन्स घेण्याचा सल्ला दिला जातो.

2. सर्वसमावेशक इन्श्युरन्समधील अपवाद काय आहेत?

कारचे वय, नुकसान आणि तूट यामुळे झालेले नुकसान. कारच्‍या वयानुसार पार्ट्सचे होणारे डेप्रीसिएशन. मद्याच्या प्रभावाखाली वाहन चालवल्यामुळे झालेले कारचे नुकसान. आण्विक हल्ला किंवा बंडखोरी युद्धामुळे कोणतीही कारचे नुकसान.

अंतिम विचार

खरेदी करण्यासाठी ऑनलाईन कार इन्श्युरन्स साठी एकाधिक पर्याय उपलब्ध आहे. परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अपघाताच्या वेळी आवश्यक खर्च कव्हर करणारा कार इन्श्युरन्स खरेदी करणे आणि त्याच्या वयानुसार कारची काळजी घेणे महत्वपूर्ण ठरते. झिरो डेप्रीसिएशनच्या ॲड-ऑनसह सर्वसमावेशक इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्याची शिफारस केली जाते. कारण महाग स्पेअर्स पार्ट्सच्या स्थितीत डेप्रीसिएशनचे दर देखील जास्त असतात. दुरुस्तीसाठी अधिक रक्कम खर्च करण्यापेक्षा अधिकचा प्रीमियम अदा करणे केव्हाही सर्वोत्तमच.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत