रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
Benefits of Porting Health Insurance
मे 31, 2021

हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करण्याचे फायदे

अधिक प्रीमियम व दुय्यम सर्व्हिस प्रदान करणाऱ्या इन्श्युरन्स कंपन्यांमध्ये अडकलेल्या व्यक्तींसाठी हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी हे वरदान ठरत आहे. नवीन इन्श्युरर मध्ये तुमचे हेल्थ इन्श्युरन्स पोर्टिंग करणे निश्चितच लाभदायक बाब ठरते. कारण तुमचे सध्याच्या पॉलिसीचे लाभ कायम राहतात आणि नवीन इन्श्युरर सह पोर्ट करुन स्वत:ला इन्श्युअर्ड करू शकतात. याची संकल्पना हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी 2011 मध्ये पहिल्यांदा Insurance Regulatory and Development Authority of India (IRDAI) द्वारे सादर करण्यात आली. त्या अंतर्गत, जर कोणतीही व्यक्ती क्लेम सेटलमेंट समस्या, अधिक प्रीमियम, स्लो रिएम्बर्समेंट किंवा खराब सर्व्हिस यामुळे त्यांच्या विद्यमान इन्श्युरन्स पॉलिसी सह असमाधानी असल्यास ते कोणतेही लाभ गमावल्याशिवाय नवीन इन्श्युरर मध्ये पॉलिसी मध्ये स्विच करण्यास पात्र असतात.

तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करण्याचे 7 संभाव्य लाभ

तुम्ही तुमच्या विद्यमान इन्श्युरन्स प्लॅनबाबत समाधानी नसल्यास हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करण्याचे अनेक फायदे आहेत. चला काही प्रमुख लाभ पाहूया:

1.     मागील पॉलिसीच्या लाभांचे कोणतेही नुकसान नाही

तुमचा हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन पोर्ट करून तुम्हाला मिळणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या विद्यमान इन्श्युरन्स प्लॅनचा कोणताही फायदा गमावणार नाही. तुमच्या पॉलिसीमध्ये विद्यमान इन्श्युररने दिलेले सर्व लाभ तुम्ही निवडलेल्या नवीन पॉलिसी प्लॅनमध्ये लागू राहतील.

2.     सर्वोत्तम सम इन्श्युअर्ड वॅल्यू

जेव्हा तुम्ही तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी नवीन इन्श्युररकडे पोर्ट करता तेव्हा तुमच्या मागील पॉलिसीचा एकत्रित बोनस नवीन सम इन्श्युअर्ड वॅल्यूमध्ये समाविष्ट केला जातो. यामुळे तुमच्या पॉलिसीची वर्तमान वॅल्यू वाढते आणि चांगले लाभ मिळतात. तसेच, नो क्लेम बोनस तुमच्या नवीन सम इन्श्युअर्ड वॅल्यू मध्येही समाविष्ट केला जातो.

3.     कमी पॉलिसी प्रीमियम

गेल्या काही वर्षांमध्ये इन्श्युरन्स कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कंपन्या नेहमीच त्यांचा वर्तमान कस्टमर बेस वाढविण्यासाठी अनेक ऑफरिंग आणि इतर लाभ देऊ करीत आहेत. म्हणून, जेव्हा तुम्ही नवीन इन्श्युररकडे स्विच करता तेव्हा अधिक कमी प्रीमियम दराने जुन्या पॉलिसीचे विद्यमान लाभ मिळण्याची शक्यता अधिक असते. इन्श्युरन्सचा खर्च कमी करण्यात आणि तुमच्या पैशाची अधिक बचत करण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त असेल.

4.     पॉलिसी कस्टमाईज करण्याची क्षमता

पोर्टिंगचा सर्वात महत्वपूर्ण लाभ म्हणजे तुमच्या आवश्यकतेनुसार हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी कस्टमाईज्ड करू शकतात. काही आरोग्य समस्या असू शकतात ज्यावर तुम्हाला तुमची पॉलिसी लक्ष केंद्रित करायची आहे किंवा तुम्हाला तुमच्या पॉलिसीमधील नॉमिनी बदलायचा आहे. तुमच्या जुन्या इन्श्युरर कडून नवीन इन्श्युरर कडे स्विच करताना पॉलिसीमधील कोणतेही कस्टमायझेशन केले जाऊ शकते.

5.     अधिक पारदर्शक सिस्टीम प्राप्त करण्याचा पर्याय

इन्श्युरन्स कंपन्यांना पॉलिसीमधील अपारदर्शक आणि छुप्या नियमांसाठी नेहमीच दोष दिला जातो. तुम्ही नवीन इन्श्युरन्स कंपनीकडे पोर्ट करीत असल्याने तुम्हाला अशा संस्थेचा रिसर्च करावा लागेल ज्यात अधिक पारदर्शक पद्धती आहेत आणि कोणत्याही छुपे नियम किंवा अटींशिवाय काम करते.

6.     सर्वोत्तम क्लेम सेटलमेंट गुणोत्तर मिळवा

तुमच्या इन्श्युरन्स प्लॅनसाठी नवीन इन्श्युरर निवडताना हेल्थ इन्श्युरन्स क्लेम सेटलमेंट गुणोत्तर तपासल्याची खात्री करा. बहुतांश तक्रारींमध्ये त्यांच्या विद्यमान इन्श्युररकडून असलेली तक्रार म्हणजे क्लेम सेटलमेंट प्रक्रियेची जटिलता होय. जर तुम्ही पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी या घटकाचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या नवीन इन्श्युरर सह चांगल्या सेवांचा आनंद घेऊ शकता.

7.     सर्वोत्तम सर्व्हिस प्रोव्हायडर मिळवा

जर तुमची इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करण्याचे कारण तुमच्या इन्श्युररच्या कमी दर्जाच्या सर्व्हिस असेल तर तुम्ही पोर्टिंग बाबत निश्चितच. समाधानी असायला हवे. तुम्हाला सर्वोत्तम इन्श्युरर निवडण्याची निश्चितच संधी आहे. अशी कंपनी शोधा जी बहुतांश उच्च दर्जाच्या सेवांसाठी पुरस्कृत केली जाते आणि नंतर तुमचा पर्याय निवडा.

पोर्टेबिलिटी विनंती नाकारण्याचे संभाव्य कारण

होय, तुम्ही हे बरोबर वाचले आहे! हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करण्याचे फायदे मोठ्या प्रमाणात असले तरीही, तुमची पोर्टेबिलिटी विनंती नाकारण्याची शक्यता आहे. नेमकं केव्हा घडेल त्याची कारणे खालीलप्रमाणे:
  1. पॉलिसी रिन्यूवल कालावधीमध्ये ब्रेक असल्यास.
  2. जेव्हा तुम्ही चुकीची किंवा अयोग्य माहिती प्रदान करता.
  3. जर डॉक्युमेंट्स सबमिट करण्यास विलंब झाला असेल.
  4. जर तुम्ही सबमिट केलेले डॉक्युमेंट्स ॲक्सेस करण्यायोग्य नसल्यास.
  5. जर क्लेम रेकॉर्ड परिपूर्ण नसेल.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू)

  1. नवीन हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनमध्ये पोर्ट करण्यासाठी कोणतीही प्रोसेसिंग फी आहे का?
नाही, पोर्टेबिलिटी प्रक्रियेसाठी तुम्हाला कोणतेही प्रोसेसिंग शुल्क आकारले जाणार नाही.
  1. पोर्टिंग प्रोसेस साठी किती वेळ लागतो?
सामान्यपणे, नवीन इन्श्युररला तुमचे ॲप्लिकेशन सबमिट केल्यापासून 15 दिवसांच्या आत प्रतिसाद द्यावा लागेल. एकूणच, प्रक्रियेसाठी जवळपास 30 दिवस लागू शकतात. निष्कर्ष हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करण्याचे फायदे मोठे आहेत. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या सध्याच्या इन्श्युरर सोबत समाधानी नसल्यास आणि त्यांच्या सेवांबद्दल असमाधानी असल्यास तुमची पॉलिसी पोर्ट करणे आणि नवीन इन्श्युरन्स प्रोव्हायडर्सच्या सर्व्हिसचा आनंद घेणे चांगले आहे.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत