कार खरेदी करणे हे अद्याप भारतातील अनेकांचे स्वप्न आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमचे उद्दिष्ट पूर्ण करता, तेव्हा पुरेशा आणि योग्य इन्श्युरन्ससह तुमचा प्लॅन सुरक्षित ठेवणे आवश्यक होते. कायद्यानुसार थर्ड-पार्टी इन्श्युरन्स असणे अनिवार्य आहे. याशिवाय, तुमचा ओन डॅमेज इन्श्युरन्स असण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून अपघात झाल्यास तुमची आर्थिक स्थिती सुरक्षित राहील. आता थर्ड-पार्टी इन्श्युरन्स आणि ओन डॅमेज कव्हर या दोघांना एकत्रित करणारी पॉलिसी सर्वसमावेशक असते. तरीही, एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो की आपण घेतलेल्या इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये सम इन्श्युअर्ड किती आहे? आणि कार इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करणे शक्य आहे का? आयडीव्हीच्या आधारे सम इन्श्युअर्ड निर्धारित केले जाते ज्याचा अर्थ इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू असा आहे. आणि ही निवडीची बाब आहे की तुम्ही कशाची निवड करता
ऑनलाईन कार इन्श्युरन्स किंवा ऑफलाईन, परंतु पर्यायाची निवड करण्याआधी विविध ऑफरिंग्सची ऑनलाईन तुलना करणे सोपे आहे.
इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू म्हणजे काय?
आपण यापूर्वी पाहिले आहे की आयडीव्ही हे कार इन्श्युरन्स पॉलिसीचे सम इन्श्युअर्ड आहे. जर कारचे नुकसान झाले किंवा चोरीला गेली तर इन्श्युरन्स कंपनी इन्श्युअर्डला देय करेल ही अशी कमाल रक्कम आहे.
इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू कशी ठरवली जाते?
नवीन कारसाठी, इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू ही उत्पादकाने सूचीबद्ध केलेली एक्स-शोरूम किंमत असते. प्रत्येक सरत्या वर्षाला डेप्रीसिएशन अप्लाय होईल. नवीन खरेदी केलेल्या कारचे डेप्रीसिएशन 5% आहे, त्यामुळे तुमच्या कारचा कमाल आयडीव्ही एक्स-शोरूम किंमतीच्या 95% असेल. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की जेव्हा तुम्ही तुमची कार शोरूम मधून बाहेर काढता, तेव्हा आयडीव्ही कमी होते आणि 5 वर्षांपर्यंतची जुनी कार 50% च्या रेट पर्यंत डेप्रीसिएट होऊ शकते. डेप्रीसिएशन रेट दर्शविणारे शेड्यूल खाली दाखवले आहे
कारचे वय |
डेप्रीसिएशन रेट |
सहा महिन्यांपेक्षा अधिक नाही |
5% |
6 महिन्यांपेक्षा अधिक परंतु 12 महिन्यांपेक्षा अधिक नाही |
15% |
1 वर्षापेक्षा अधिक परंतु 2 वर्षांपेक्षा अधिक नाही |
20% |
2 वर्षांपेक्षा अधिक 3 वर्षांपेक्षा अधिक नाही |
30% |
3 वर्षांपेक्षा अधिक 4 वर्षांपेक्षा अधिक नाही |
40% |
4 वर्षांपेक्षा अधिक 5 वर्षांपेक्षा अधिक नाही |
50% |
जर कारचे वय पाच वर्षांपेक्षा अधिक असेल तर इन्श्युरन्स कंपनी आणि कार मालकाच्या दरम्यान इन्श्युरन्ससाठी कारचे मूल्य परस्पर ठरवले जाते.
कार इन्श्युरन्समध्ये आयडीव्ही का महत्त्वाचा आहे?
जर तुम्हाला याविषयी प्रश्न असेल की "कार इन्श्युरन्समध्ये आयडीव्ही का महत्त्वाचा आहे?" तर उत्तर येथे दिले आहे: आयडीव्ही ही क्लेमची कमाल रक्कम आहे जी इन्श्युअर्ड वाहनाच्या संदर्भात कारच्या मालकाकडून पुढे केली जाऊ शकते. जर आयडीव्ही अधिक असेल, तर अपघात किंवा इतर क्लेम करण्यायोग्य इव्हेंट घडल्यास जास्त रक्कम क्लेम करणे शक्य आहे. 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कारसाठी जास्त आयडीव्ही असणे शक्य आहे कारण त्या प्रकरणांमध्ये आयडीव्ही दोन्ही पार्टी मध्ये परस्पर ठरवले जाते. परस्पर ठरवलेले आयडीव्ही सामान्यपणे 15% पर्यंत अधिक किंवा कमी प्रमाणात बदलते.
इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू इन्श्युरन्स प्रीमियमवर परिणाम करते का?
इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू चा इन्श्युरन्स प्रीमियमसह थेट संबंध असतो. सामान्यपणे, इन्श्युरन्स प्रीमियम आयडीव्ही च्या 2%-3% असते. म्हणूनच जास्त आयडीव्ही म्हणजे जास्त इन्श्युरन्स प्रीमियम. त्यामुळे जर तुम्हाला कमी प्रीमियम हवे असेल तर कमी आयडीव्ही मूल्य निवडणे सुरक्षित आहे. परंतु याचा अर्थ असाही होतो की तुमच्याकडे कमी सम इन्श्युअर्ड असेल आणि जर तुमची क्लेम रक्कम सम इन्श्युअर्ड पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पूर्णपणे देय केले जाणार नाही.
मला माझ्या कारचे संपूर्ण इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू कधी देय केले जाईल?
अशा दोन परिस्थिती असतील जेव्हा तुम्हाला सम इन्श्युअर्डची संपूर्ण रक्कम मिळू शकेल. पहिली म्हणजे जेव्हा तुमची कार चोरीला जाईल. जर तुमचे वाहन चोरीला गेले तर बराच शोध आणि पोलिस डॉक्युमेंटेशन नंतर, इन्श्युरन्स कंपनी संपूर्ण रकमेसह तुमच्या क्लेमला मान्य करेल. दुसरी परिस्थिती म्हणजे जेव्हा तुमची सिंगल क्लेम रक्कम सम इन्श्युअर्डच्या 75% पेक्षा अधिक असेल. जर तुमची सिंगल क्लेम रक्कम आयडीव्ही च्या 75% पेक्षा अधिक असेल तर इन्श्युरन्स कंपनी तिला संपूर्ण नुकसान परिस्थिती मानेल आणि तुम्हाला संपूर्ण रक्कम देय करेल. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की येथे तुम्ही एकूण वजावट रक्कम भरण्यास जबाबदार असाल.
माझ्यासाठी कोणती पॉलिसी सर्वोत्तम आहे?
मार्केटमधील विविध
मोटर इन्श्युरन्सचे प्रकार मधून, पॉलिसी आयडीव्हीच्या सर्वात जवळील वर्तमान मार्केट मूल्य असलेली पॉलिसी तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे कारण जर तुमच्या कारला काही झाले तर ती तुम्हाला सर्वोत्तम संरक्षण प्रदान करेल. म्हणूनच, इष्टतम प्रीमियम रेट्ससाठी तुमच्या वाहनाचे अचूक मूल्य सेट करण्यासाठी
इन्श्युरन्स मध्ये आयडीव्ही म्हणजे काय हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे.
एफएक्यू:
मी एका पॉलिसी वर्षात एकापेक्षा जास्त वेळा कार इन्श्युरन्सचा क्लेम करू शकतो का?
होय, दिलेल्या पॉलिसी वर्षात एकापेक्षा जास्त वेळा कार इन्श्युरन्सचा क्लेम करणे शक्य आहे, जर एकूण क्लेमची रक्कम सम इन्श्युअर्ड पेक्षा अधिक नसेल.
इन्श्युरन्स कंपनीने जास्त आयडीव्ही ला सहमती दिली आहे आणि नंतर क्लेमची रक्कम सामान्य आयडीव्ही पेक्षा अधिक असते परंतु सहमती दिलेल्या जास्त आयडीव्ही पेक्षा कमी असते. इन्श्युरन्स कंपनी या आधारावर क्लेम नाकारू शकते का?
नाही, क्लेम सामान्य आयडीव्ही पेक्षा अधिक असण्याच्या आधारावर इन्श्युरन्स कंपनी क्लेम नाकारू शकत नाही जर ते सहमती दिलेल्या आयडीव्ही च्या आत असेल.
प्रत्युत्तर द्या