रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
Here's why you should buy a health plan before going into your thirties
एप्रिल 15, 2015

तुमच्या 30s मध्ये हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करण्याची 5 कारणे

आजमितिला उपचारांचा खर्च दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसागणिक निदान आणि शस्त्रक्रियेसाठी नावीन्यपूर्ण मेडिकल टेक्नॉलॉजी विकसित होत आहे. गेल्या काही वर्षापासून उपचारांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक परिस्थितीत, कॅन्सर, लिव्हर सिरोसिस (लिव्हर फेल्युअर) किंवा किडनी विकार अशा जटिल आजारांच्या स्थितीत हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यास अनेकांना केवळ स्वत:च्या सेव्हिंग्स गमवाव्या लागत नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या सेव्हिंग्सवर पाणी सोडावे लागते. उदाहरणार्थ, जेव्हा दिल्ली मध्ये स्वाईन फ्लूच्या मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव होता. तेव्हा दुर्देवाने आमचे इन्श्युअर्ड स्वाईन फ्यूच्या तावडीत सापडले. उपचारांचे बिल अंदाजित 20 लाख रुपयांवर पोहोचले. इन्श्युरन्स पॉलिसीच्या बॅक-अप शिवाय, हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी त्यांच्या वर घराची विक्री करण्याची वेळ येऊन ठेपली. या लेखात, आम्ही विशद करीत आहोत. लवकरात लवकर हेल्थ इन्श्युरन्स खरेदीची प्रमुख कारणे.

तुमच्या 30s मध्ये हेल्थ पॉलिसी का खरेदी करता याची 5 कारणे येथे आहेत

सर्वोत्तम उपचार मिळवा

भारतातील लहान शहरांमध्येही असंख्य कॉर्पोरेट हॉस्पिटल्स वाढत आहेत. हे हॉस्पिटल्स टियर 3 शहरांमध्येही सर्वोत्तम उपचार प्रदान करतात. डीलक्स, व्हीआयपी किंवा राष्ट्रपती सूट रुम, हेलिकॉप्टर अॅम्ब्युलन्स सुविधा, रोबोटिक आर्म्स, स्टिच-लेस शस्त्रक्रिया, पिन होल शस्त्रक्रिया इ. सारख्या नवीनतम ऑपरेटिव्ह तंत्रज्ञान ऑफर करतात. या सुविधांमुळे उपचारांचा खर्च अत्यंत वाढला आहे. सर्वोत्तम सुविधा आणि आरामदायी जागतिक दर्जाच्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी,मध्यम आणि उच्च मध्यम वर्गीय व्यक्तींकडे निश्चितच हेल्थ इन्श्युरन्स हा असायला हवा. त्यामुळे जेव्हा हॉस्पिटल मध्ये दाखल होतेवेळी 10 लाखांपेक्षा अधिक सम इन्श्युअर्डचा हेल्थ इन्श्युरन्स असल्यास आपल्याला सर्वोत्तम आरोग्य सेवांचा निश्चितच लाभ घेता येऊ शकतो. बजाज आलियान्झ कडे हेल्थ केअर सुप्रीम सारखे ओपीडी सुविधा प्रदान करणारे अनेक हेल्थ इन्श्युरन्स आहेत. या उच्च ओपीडी प्लॅन्ससह, तुम्ही कोणत्याही समस्येशिवाय एका वर्षात ओपीडी उपचाराच्या ₹25000 पर्यंत प्राप्त करू शकता.

पर्यायी उपचारांचा लाभ घ्या

हेल्थ इन्श्युरन्ससह, तुम्ही आयुर्वेद आणि होमिओपॅथी यांसारख्या पर्यायी उपचारांच्या लाभांचा आनंद घेऊ शकता. अनेक लोक ओपीडी स्तरावर आयुर्वेद आणि होमिओपॅथी उपचारांना प्राधान्य देतात. तथापि, पर्यायी उपचारांचा लाभ घेण्यासाठी, त्यांना त्यांच्या खिशातून पैसे खर्च करणे आवश्यक आहे. बजाज आलियान्झ हेल्थ केअर सुप्रीम सारख्या नवीन इन्श्युरन्स प्लॅन्ससह अशा प्रकाराच्या खर्चाचा भार सहन करण्याची आवश्यकता भासत नाही. तुम्ही देशात कुठेही पर्यायी उपचारांचा आनंद घेऊ शकता.

टॅक्स सेव्हिंग लाभ मिळवा

जर तुम्ही उच्च इन्कम स्लॅबमध्ये असाल तर अतिरिक्त टॅक्स भरणे टाळण्यासाठी टॅक्स सेव्हिंग ही काळाची निकड बनली आहे. तुम्ही निश्चितपणे टॅक्सची सेव्हिंग्स करू शकतात, हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करुन सेक्शन 80D अंतर्गत कपात इन्कम टॅक्स ॲक्ट नुसार अदा केलेल्या प्रीमियम वर प्राप्त करू शकता.

लॉयल्टी लाभ मिळवा

जेव्हा तुम्ही इन्श्युरन्स कंपनीसोबत लवकर पॉलिसी खरेदी करता, तेव्हा तुम्ही वेळेनुसार त्या इन्श्युरन्स कंपनीसोबत एक विश्वासार्ह कस्टमर बनता. कंपनी तुमचा प्राधान्यक्रमावरील कस्टमर म्हणून विचारात घेते. जेव्हा तुम्ही दीर्घकाळासाठी क्लेम केलेला नसतो. यामुळे तुम्हाला एकाधिक लाभांचा आनंद घेणे शक्य ठरते. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही क्लेमसाठी फाईल करता, तेव्हा ते प्राधान्यक्रमाने सेटल केले जातात.

वेलनेस लाभ मिळवा

अनेक इन्श्युरन्स कंपन्यांसाठी वेलनेस लाभ हे गेम चेंजर आहेत. मोठ्या ब्रँडशी संपर्क साधून, मोफत योग वर्ग आणि जिम सदस्यत्व, पंचकर्म उपचार, दंत उपचार, कॉलवर डॉक्टर इ. सारख्या अत्यंत सवलतीच्या किंमतीत सुविधा प्रदान करून आरोग्य तपासणी कॅम्प आयोजित करण्यासारख्या क्लायंटसाठी वेलनेस उपक्रमांवर लक्ष केंद्रित करतात. भिन्न बाबींबाबत जाणून घ्या भारतातील हेल्थ इन्श्युरन्सचे प्रकार आणि तुमच्या वैयक्तिक गरजांसाठी अनुरूप सर्वोत्तम कव्हर शोधा. हा लेख डॉ. जगरुप सिंग (आयएलएम-हेल्थ, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कं. लिमिटेड) यांनी लिहिलेला आहे.    *प्रमाणित अटी लागू *इन्श्युरन्स हा विनंतीचा विषय आहे. लाभ, अपवाद, मर्यादा, अटी व शर्तींविषयी अधिक तपशीलासाठी, कृपया सेल्स पूर्ण करण्यापूर्वी सेल्स ब्रोशर/पॉलिसी मजकूर काळजीपूर्वक वाचा.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

  • Rajendra - April 23, 2015 at 6:54 pm

    Informative article on health insurance

  • Riddhima - April 23, 2015 at 6:17 pm

    That’s quite a lot of info..but it’s presented in a really easy manner!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत