रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
What is Top Up Health Insurance & How Does it Work?
मार्च 4, 2021

टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स म्हणजे काय?

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन द्वारे तुमच्या गरजांची पूर्तता होते. परंतु एक वेळ अशी येते की जेव्हा हॉस्पिटलचे बिल हेल्थ इन्श्युरन्सच्या रकमेपेक्षा जास्त असते. तेव्हा तुम्हाला स्वत:च्या खिशातून देखील कधीकधी अतिरिक्त रक्कम भरावी लागू शकते. तथापि, टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनसह तुम्ही अशाप्रकारच्या संकटांवर निश्चितपणे मात करू शकतात.

टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स म्हणजे काय?

टॉप अप हेल्थ इन्श्युरन्स हे जेव्हा पॉलिसीधारकांची हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सची कमाल मर्यादा ओलांडली जाते, तेव्हा हेल्थ इन्श्युरन्स कंपन्यांद्वारे त्यांना ऑफर केले जाणारे अतिरिक्त कव्हरेज आहे. उदाहरणार्थ, श्री. ए यांच्‍याकडे ₹ 3 लाखांची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी आहे. ते दरवर्षी प्रीमियम रक्कम ₹ 6000 भरतात. परंतु त्यांना वाटते की हे कव्हरेज पुरेसे नाही. त्यानुसार, जर ते विद्यमान हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी कव्हरेज ₹ 3 लाखांपासून ₹ 5 लाखांपर्यंत वाढवत असेल तर प्रीमियमची रक्कम ₹10,000 असेल. परंतु त्याऐवजी, ते टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनची निवड करतात, ज्यामध्ये प्रत्येक 1 लाखांच्या टॉप-अपसाठी ₹1000 प्रीमियम आहे. त्यामुळे अतिरिक्त 2 लाखांच्या कव्हरसाठी, ते अतिरिक्त ₹ 2000 भरतात. जे वार्षिक ₹ 8,000 आहे.

हेल्थ इन्श्युरन्स मध्ये टॉप-अप म्हणजे काय?

जर पॉलिसीधारकाचा वैद्यकीय आपत्कालीन क्लेम हा हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी प्लॅनपेक्षा जास्त असल्यास पॉलिसीधारक टॉप-अप प्लॅनमधून अतिरिक्त रक्कम क्लेम करू शकतो. दोन प्रकारचे प्लॅन्स आहेत - टॉप-अप आणि सुपर टॉप-अप.
  1. टॉप-अप प्लॅन: प्रति वर्ष प्रति क्लेम आधारावर आणि जेव्हा क्लेमची रक्कम वर्तमान हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीच्या कव्हरेज रकमेपेक्षा जास्त असेल तेव्हा लागू होतो.
  2. सुपर टॉप-अप प्लॅन: जेव्हा एकाच वर्षात क्लेमची पुनरावृत्ती होते व पॉलिसीधारकाच्या हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सचे कव्हर संपते अशा स्ठितीत लागू होतो.
   
क्लेम श्री. ए- ₹3 लाखांचा हेल्थ इन्श्युरन्स + ₹5 लाखांचा टॉप-अप प्लॅन श्री. बी-– ₹3 लाखांचा हेल्थ इन्श्युरन्स + ₹ 5 लाखांचा सुपर टॉप-अप प्लॅन
क्लेम 1 — ₹ 3 लाख हेल्थ इन्श्युरन्सद्वारे कव्हर केलेले हेल्थ इन्श्युरन्सद्वारे कव्हर केलेले
क्लेम 2 — ₹1 लाख पॉलिसीधारकांना संपूर्ण रक्कम भरणे आवश्यक आहे कारण जर हेल्थ इन्श्युरन्स कव्हरेज प्लॅनपेक्षा जास्त असेल तरच टॉप-अप प्लॅन क्लेमला कव्हर करेल. सुपर टॉप-अप प्लॅन क्लेमला कव्हर करेल. जर एकाच वर्षात एकाधिक क्लेम केल्यास व हेल्थ इन्श्युरन्स कव्हरेज रक्कम संपल्यास सुपर टॉप-अप प्लॅन एक्स्ट्रा रक्कम अदा करेल.
क्लेम 3 — ₹ 4 लाख टॉप-अप प्लॅनद्वारे केवळ ₹ 1 लाख कव्हर केले जाईल, जे पॉलिसीधारकाच्या हेल्थ इन्श्युरन्स कव्हरेज प्लॅनवरील एक्स्ट्रा रक्कम आहे. पॉलिसीधारकाने त्याच्या 1st क्लेममध्ये आधीच त्याची हेल्थ इन्श्युरन्स कव्हरेज रक्कम संपल्यामुळे तो ₹3 लाख देय करावे लागतील. सुपर टॉप-अप प्लॅन संपूर्ण रक्कम कव्हर करेल.  

टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स कसे काम करते?

टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन वर्तमान हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीची रक्कम संपल्यानंतरच ॲक्टिव्हेट होतो. टॉप-अप आणि सुपर टॉप-अप प्लॅनमधील फरक म्हणजे - टॉप-अप प्लॅनमध्ये केवळ वर्तमान हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीपेक्षा जास्त एकाच क्लेमचा समावेश होतो. याउलट, सुपर टॉप-अप प्लॅन एका वर्षात एकत्रित वैद्यकीय खर्चासाठी दावा केला जाऊ शकतो.

एफएक्यू

  1. टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स म्हणजे काय? हा प्लॅन घेण्याची नेमकी आवश्यकता काय?

पॉलिसीधारकाला वाटते की त्यांचा सध्याचा हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन वैद्यकीय किंवा आरोग्य सेवेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा नसेल. त्यावेळी कव्हरेज रक्कम वाढविण्यासाठी पॉलिसीधारक टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करू शकतो. टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स हा एक किफायतशीर प्लॅन आहे जो पॉलिसीधारकाला जीवनाच्या अनिश्चिततेच्या स्थितीत कव्हर केल्याची सुनिश्चिती प्रदान करतो.
  1. हेल्थ इन्श्युरन्स मध्ये टॉप-अप म्हणजे काय? हा प्लॅन कोणी खरेदी केला पाहिजे?

हेल्थ इन्श्युरन्समधील टॉप-अप्स प्लॅन मध्ये अनेकदा अतिरिक्त लाभ प्रोव्हायडरच्या बाबतीत स्पष्टता नसते. जसे की हॉस्पिटल कॅश, वैयक्तिक अपघात इन्श्युरन्स इ. परंतु, टॉप-अप ही प्रत्यक्षात एक पॉलिसी आहे जी नियमित हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन सारखेच लाभ प्रदान करते. प्रत्येक पॉलिसीधारकाने त्यांच्या वर्तमान हेल्थ इन्श्युरन्स बेस प्लॅन व्यतिरिक्त टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करायला हवा. याद्वारे ज्येष्ठ व्यक्तींना अधिक कव्हरेज प्राप्त होते. जसे जसे व्यक्तीचे वय वाढते त्याप्रमाणात हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम मध्ये देखील वाढ होते. टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स खरेदी केल्यामुळे प्रीमियम मध्ये मोठ्या प्रमाणात घट होते.
  1. टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स कसे काम करते?

हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी आणि टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स दोन्ही एकाच वेळी हॉस्पिटलायझेशन बिलासाठी एकत्रितपणे क्लेम केल्या जाऊ शकतात. प्रत्येक इन्श्युरर क्लेमचा भाग भरण्यास जबाबदार असतो.

निष्कर्ष:

टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन हेल्थकेअर पॉलिसी आणि वैद्यकीय आपत्कालीन खर्च यादरम्यान दुवा म्हणून काम करते. हे कमी खर्चात हेल्थ इन्श्युरन्स मर्यादा वाढवते. टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स हा पॉलिसीधारकांसाठी चांगला पर्याय आहे ज्यांच्याकडे फॅमिली फ्लोटर प्लॅन आहे किंवा वैद्यकीय आजारांची पार्श्वभूमी आहे.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत